Scientist information

या पाच भारतीय शास्त्रज्ञांनी भारत मातेसाठी केलेले कार्य पाहून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. या  शास्त्रज्ञांकडून आपणही देशासाठी काहीतरी करून दाखवावे ही प्रेरणा मिळते. जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत आणि यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे या गोष्टी आपण या शास्त्रज्ञांकडून शिकायला हव्यात

शून्य ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी अमूल्य देणगी आहे असे आपण म्हणतो पण याच शून्याचा शोध कुणी लावला हा प्रश्न जर आपणास विचारला तर लगेच उत्तर येते आर्यभट्ट. याच आर्यभट्टाचा जन्म शके ३९८ म्हणजेच इ.स. ४७६ मध्ये बिहारमधील पाटलीपुत्र येथे झाला. हा सामान्य आर्यभट्ट आपल्या असामान्य कर्तुत्वाने इतिहासात अजरामर झाला. आर्यभट्टांचे बालपण तसेच त्यांचे उर्वरित आयुष्य पाटलीपुत्र मध्येच गेले. त्यांनी लिहिलेल्या खगोलशास्रीय ग्रंथात प्रथम ‘आर्यभटिय’ किंवा आर्यसिद्धांत हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथास आर्यभटिय हे नाव स्वतः आर्यभटानीच दिले आहे. त्यास त्यांचे शिष्य आर्यासिद्धांत असे म्हणत असत. याच आर्यभटीय ग्रंथात दशगीतिका व आर्यष्ठशत असे दोन भाग आहेत. काही तज्ज्ञांच्या मते हे दोन भाग नाहीत तर ते दोन वेगवेगळे भाग आहेत. या दोन्हीही ग्रंथ हे एकमेकांवर अवलंबून असल्याने यास एकच ग्रंथ मानता येईल. त्यास पद असून फक्त एकशे एकवीस श्लोक आहेत.

5 indian scientist information in marathi language

Related Blogs

DNA Test Information in Marathi

Posted By : Abhijeet Hajare on Jan 31 , 20 01:54 PM

History of Computer

Posted By : Abhijeet Hajare on Aug 11 , 18 07:36 AM

Dokedukhi Upaay

Posted By : Abhijeet Hajare on Aug 2 , 18 10:04 AM