फेसबुकवर तरुण मुलीनी, महिलांनी घ्यायची काळजी......

फेसबुकवर तरुण 👭मुलीनी, 👵महिलांनी घ्यायची काळजी👌👍

१) तुम्ही कुणाच्या तरी पोस्ट वर मस्त कॉमेंट करता, कि लगेच धाडधाड
पुरुषांच्या फ्रेंड रिक्वेस्ट येवू लागतात !! त्यावेळी हुरळून जावू नका !!

तुमच्या कॉमेंटवर खुश होऊनच ते आलेले असतील असे नाही !! काहीवेळा तुमचा
त्यावेळी प्रोफाईल फोटोही त्यासाठी कारणीभूत असतो. तेव्हा आधी त्या
व्यक्तीच्या टाईम लाईन वर जा !! त्याच्या पोस्ट, त्याचे विचार, त्याने लाईक
केलेले पेजेस पहा !! ते तुमच्या स्वभावाला सुटेबल असतील तरच रिक्वेस्ट
घ्या !! घाई करू नका !! पुरुष देखील संयमी असतात !! वाट पाहतील तुमच्या रिक्वेस्ट होकाराची !!

२) विवाहित महिलांनी शक्यतो आपल्या "हबी"सह एकत्र असलेला फोटो प्रोफ़ाइल
म्हणून वापरावा. त्यात हबी बॉडी बिल्डर असेल तर मस्तच !! त्याला बिचकून
"नको त्या" रिक्वेस्ट किंवा कॉमेंट येणार नाहीत !!

३) कॉमेंट मध्ये
"ताई, माई" करून बोलणारे सगळेच "दादा" असतील असे नाही !! काही "आतेभाऊ /
मामेभाऊ" पण असू शकतात. त्यामुळे काय नावाने बोलतोय या पेक्षा "काय बोलतोय"
यावर त्याला ओळखा !!

४) तुमच्या वाढ दिवसाला एखाद्या मित्राने खूप
मस्त पोस्ट केली म्हणजे तो जवळचा आणि एखाद्याने शुभेच्छा द्यायला विसरल्या
म्हणजे तो दूरचा…. असे समजू नका !! वेळेअभावी शुभेच्छा नसतील दिल्या असे
समजा, वाटल्यास इन बॉक्स ला त्याला कानपिळीचा आहेर द्या !! पण वाढदिन पोस्ट
हा निकष लावू नका !!

५) ट्रीप, पिकनिक ला जरूर जा, तिथले फोटोही जरूर
इथे अपलोड करा, सरसकट सगळे फोटो
टाकत बसू नका. निवडून टाका. विशेषतः समुद्र किनारी, पावसात भिजतानाचे फोटो
तर फार "बारीक" आधी तुम्हीच पाहून घ्या, निसर्ग दर्शन घडावे, "स्व"दर्शन नको !!

६) नकळत तुम्ही एखादे चांगले काम केले असेल तर जरूर इथे अपलोड
करा. त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल आणि तुमच्या बद्द्ल देखील इमेज आदरणीय
राहील.

७) हाय ड्यूड, ह्यालो गायज…… असले स्टेटस मुळीच टाकू नका !!
तिथे जी गर्दी होईल त्यात दर्दी कमी असतील, ज्याचा नंतर तुम्हालाच त्रास
होऊन सर्दी होईल !!

८) सौंदर्य हे दिसण्यावर नसते, असण्यावर असते !!
मिन्स, साधे असलात तरी चालेल पण फोटोत एक डीसेन्सी असावी, मेकअप नसला तरी
चालेल पण नैसर्गिक भाव असावा, त्यामुळे चांगल्या लोकांना अधिक चांगले
वाटते. नवीन रिक्वेस्ट हि मग चांगल्याच येतात !!!