नवीन व्यवसाय कसा आणि कशात सुरू करावा.....?

'मला पत्रकार व्हायचं आहे. इंग्रजी साहित्यात एमए करावसं वाटतं. पण आईबाबा म्हणतात , तू चांगले 90 टक्के गुण मिळवू शकतोस. सायन्सला प्रवेश घे , कम्प्युटर इंजिनीअर होशील. मग तू अमेरिकेलाही जाऊ शकशील. त्यांची ही मानसिकता बदलणं मला तरी जमणार नाही. '


दहावीचा निकाल लागलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना याच प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. परीक्षेत जेमतेम 60 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्याने डॉक्टर बनावं अशी त्याच्या पालकांची इच्छा असते. आपल्या आथिर्क परिस्थितीपेक्षा विद्यार्थ्याची मानसिक आणि बौद्धिक कुवत सर्वात महत्त्वाची आहे , हे अनेक पालकांच्या लक्षात येत नाही. दहावीचा उंबरठा ओलांडल्यावर जर विद्यार्थ्याचं पाऊल योग्य आणि निश्चित करिअरच्या दिशेकडे वळलं नाही तर त्याला सतत अपयशाला सामोरं जावं लागतं. काही वेळा असे विद्याथीर् नैराश्यामुळे व्यसनांच्या आहारी जातात. हे सर्व थांबवायचं असेल तर आवश्यकता आहे , योग्य व्यवसाय मार्गदर्शनाची.

एकविसावं शतक ' कम्प्युटर युग ' मानलं जातं. या युगात अनेक पारंपरिक व्यवसाय नष्ट होऊन छोटेमोठे अनेकविध व्यवसाय निर्माण झाले आहेत. या विविध व्यवसायांची त्यांना आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्याकडे असणं आवश्यक आहे. ही माहिती देण्याच्या क्रियेला ' व्यवसाय मार्गदर्शन ' म्हणतात. व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे व्यक्तीला व्यवसाय निवडण्यासाठी , निवडलेल्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी व्यवसायातील प्रवेशासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीसंबंधी केलेलं मार्गदर्शन.

व्यवसाय मार्गदर्शन ही व्यक्तीला स्वयंनिर्णयाकडे नेणारी प्रक्रिया आहे. व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे उपदेश नव्हे. ही मदत निवड यांची एकत्रित प्रक्रिया आहे. यासाठी सर्व व्यवसायांतील फायदे तोटे यांची तोंडओळख असणं आवश्यक आहे. व्यवसाय निवडताना विद्यार्थ्यांनी पालकांनी दोन घटकांचा विचार करावा. पहिला घटक म्हणजे पाल्याची पात्रता , कुवत दुसरा घटक म्हणजे संबंधित व्यवसाय जीवनाचा परिचय.

व्यवसाय मार्गदर्शन अधिक परिणामकारक , सकस अर्थपूर्ण होण्यासाठी व्यवसाय निवडीच्या प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या खालील घटकांचा विचार होणं आवश्यक आहे. :

बुद्धिमत्ता
अभियोग्यता
अभिरुची
शैक्षणिक प्रावीण्य

शरीरयष्टी

भावनिक वृत्ती

वैयक्तिक गुण

पालकांची आथिर्क स्थिती

कौटुंबिक स्थिती

सामाजिक स्थिती

शैक्षणिक सुविधा इतर बाबी


वर दिलेल्या घटकांपैकी काही घटकांची माहिती :

बुद्धी

विशिष्ट क्षणी योग्य प्रकारे कृती करण्याची पात्रता म्हणजे बुद्धी. कल्पना संकल्पना यांना समजून घेऊन , आकलन , चिकित्सा करून अचूक निर्णय घेणं हे बुद्धीचं कार्य असतं. बुद्धी ही जन्मजात देणगी आहे. आपली बुद्धी व्यक्तिमत्त्व संक्रमणाच्या अवस्थेत विकसित होत असते. ज्ञानसंपादनाची मर्यादा गुणवत्ता बुद्धीच्या मर्यादेवर ठरत असते.

साधारणपणे व्यक्तीचं मोजमाप बौद्धिक कसोटीनुसार केलं जातं. कसोट्यांच्या फलितावरून शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शन करणं सोयीचं होतं. विद्यार्थ्याने स्वत:च्या बौद्धिक पात्रतेनुसार क्षेत्राची किंवा व्यवसायाची निवड केल्यास त्यात अधिक प्रगती करता येते.

बुद्धिमापनाच्या कसोट्यांना ' वगीर्करणाच्या कसोट्या ' म्हणतात. या वगीर्करणाच्या आधारे व्यक्तीला व्यवसाय मार्गदर्शन करणं सोयीचं झालं आहे.

अभियोग्यता


व्यक्तीच्या अंगी असलेल्या विशिष्ट क्षेत्रातील कौशल्यपूर्ण क्षमतेला अभियोग्यता म्हणतात. उदा. सचिन तेंडुलकरच्या अंगी क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक अभियोग्यता आहे , म्हणून त्याची कामगिरी देदिप्यमान झाली. अभियोग्यतेला सरावाची जोड देणं आवश्यक आहे. अभियोग्यतेनुसार मार्गदर्शन केल्यास जीवनास निश्चित वळण प्राप्त होतं.

बुद्धिमत्ता अभियोग्यता यांचा घनिष्ठ संबंध आहे. दोन समान बुद्धिअंक असणाऱ्या व्यक्ती भिन्न अभियोग्यतेनुसार भिन्न व्यवसायास पात्र होतात.

उदा. एकच बुद्धिअंक असलेली व्यक्ती अभियोग्यतेनुसार तत्वज्ञ किंवा शास्त्रज्ञ होते.

तसंच बुद्ध्यांक कमी परंतु अभियोग्यता चांगली असेल तर विशिष्ट क्षेत्रातील कारागीर बनू शकतो.
उदा. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये तांत्रिक अभियोग्यता असेल बुद्ध्यांक सरासरीहून जास्त असेल तर तो विद्याथीर् मेकॅनिकल ड्राफ्ट्समन बनू शकतो. म्हणजेच व्यवसाय निवडीमध्ये तुमचा बुद्ध्यांक आणि अभियोग्यता यांचा समप्रमाणात विचार करायला हवा.

प्रत्येकाचा बुद्ध्यांक आणि अभियोग्यता वेगळी असते. त्यामुळे आपल्या घरातील सर्व डॉक्टर बनले म्हणून आपल्या मुलानेही डॉक्टर बनावं हा अट्टहास पालकांनी सोडायला हवा.

प्रत्येक उद्योगक्षेत्रात , व्यवसायात इतकंच नव्हे , तर सामान्य लोकांच्या जीवनातसुद्धा सतत जरुरी असणारा सेवा उद्योग किंवा सविर्स इंडस्ट्री युवकवर्गासाठी आव्हानात्मक क्षेत्र आहे. धडाडीच्या युवकांना या क्षेत्रात अनेक नवीन संधी उपलब्ध होत आहेत.

सविर्स इंडस्ट्रीची वैशिष्ट्यं :

1. सर्व उद्योग , व्यवसाय तसंच सामान्य माणसाच्या गरजा पुरवणारा महत्त्वाचा व्यवसाय.

2. उद्योजक होण्याची ही पहिली पायरी.
3.
अभ्यास सांभाळून करता येण्यासारखा व्यवसाय.

4. भांडवलाची चिंता नाही.

5. कौशल्याची अट नाही.

6. एका व्यक्तीने किंवा ग्रुपने करता येणारा व्यवसाय

सविर्स इंडस्ट्रीचं क्षेत्रं :

1. फूड इंडस्ट्री : केटरिंग , हॉटेल , फास्टफूड , बेकरी , कन्फेक्शनरी.

2. आरोग्यसेवा : डॉक्टर , फिजिओथेरपिस्ट , पॅथलॉजिस्ट.
3.
वाहतुक व्यवस्था : कार , बस भाड्याने देणं.

4. हाऊसकीपिंग : ऑफिस , घर , हाऊसिंग सोसायटी स्वच्छता , पेण्टिंग , निगा इत्यादी.

5. दुरुस्ती निगा : इलेक्ट्रॉनिक , कम्प्युटर , मेडिकल इत्यादी सेवा.

6. कार्यालयीन : इलेक्ट्रॉनिक टायपिंग , कुरिअर , कस्टम , सेल्स टॅक्स , आयकर , जाहिरात , माकेर्टिंग.

7. माहिती व्यवस्थापन/तंत्रज्ञान : कम्प्युटर हार्डवेअर/सॉफ्टवेअर , सायबर कॅफे , डीटीपी.

8. शैक्षणिक मार्गदर्शन : क्लासेस

9. आथिर्क : गुंतवणूक , बँक सेवा , सोसायटींचे हिशेब.

10. पर्यटन : बुकिंग , गाइड इत्यादी.

11. मनोरंजन : गायन , रेडिओ जॉकी , व्हिडीओ जॉकी.

12. कलाक्षेत्र : टेक्स्टाइल , फनिर्चर डिझायनिंग , सिरॅमिक पेण्टिंग , जेम्स अॅण्ड ज्वेलरी डिझायनिंग.

13. विक्री : नामांकित कंपन्यांचे वितरक , व्यवसाय सेवा (फास्टफूड , बेकरी उत्पादनं , कम्प्युटर संबंधित

सेवा).

14. कृषी व्यवसाय : नर्सरी , बायोलॉजिकल चार्ट्स.

वरील विषयांशी संबंधित व्यवसाय सुरू करून युवकांना नव्या क्षेत्रात प्रवेश करता येईल. विशिष्ट वयात प्रवेश केल्यानंतर मुलांना बिझनेसमन होण्याविषयी मार्गदर्शन केल्यास , त्यांना योग्य निर्णय घेणं सोपं जाऊ शकेल. आपल्या आवडीच्या बिझनेससंबंधी अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्र , पुस्तकं , इंटरनेट या सेवांचा उपयोग करता येईल. त्या त्या क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घ्यावं. आपल्या आवडीच्या क्षेत्रात अर्धवेळ तरी काम केल्यास , अनुभव मिळतो आणि संपर्कही वाढतो.

Views: 8388

Tags: How, business??, new, own, start, to

Comment

You need to be a member of Marathi Adda to add comments!

Join Marathi Adda

About

Lahu Gawade created this Ning Network.

packers and movers in mumbai

Events

Ads

Forum

JOB

Started by SANDEEP in Marathi Adda Help Aug 23. 0 Replies

Earn in part time more than 20k per month

Started by Rajesh sawant in Nokari Pahije. Last reply by SANTOSH DEVAJI PENDHARI Jun 27. 2 Replies

मुंडे, महाजन आणि 3

Started by महावीर सांगलीकर in मनोरंजन Jun 4. 0 Replies

http://ngo.prabalgad.com

Started by Sanjay Rathod in Marathi Bhasha Feb 26. 0 Replies

chat

Started by sunil bandre in Marathi Bhasha Feb 24. 0 Replies

Are you interested in extra side income?

Started by Rajesh sawant in Nokari Pahije. Last reply by Mahadev Chavan Feb 24. 67 Replies

lota jati hai

Started by abhjeet in Marathi Bhasha Dec 21, 2013. 0 Replies

Badge

Loading…

© 2014   Created by Lahu Gawade.

Badges  |  Report an Issue  |  Terms of Service